पेंढरी हायस्कूलमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन

विद्यार्थ्यांनी गावच्या रानभाज्यांना शास्त्रीय उमज दिली

शिरगाव (प्रतिनिधी) :     पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात रानभाजी प्रदर्शन व जनसहभाग उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक रानभाज्यांचे आयुर्वेदिक महत्त्व, उपयोग, तसेच पाककृतींचे सादरीकरण केले.

या प्रदर्शनात २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी घोळ, चवळी, शेवगा, लाल माठ, राजगिरा, कुरडू, पेवगा, फोडशी, अळू, करटोली, शेवग्याच्या शेंगा अशा रानभाज्यांचे सजीव सादरीकरण करून त्यांचे औषधी गुणधर्म व आहारातील उपयोग प्रभावीपणे मांडले.

कार्यक्रमानंतर रानभाज्यांचा व्यवहार पार पडला. पालक, नागरिक व शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक श्री.सत्यपाल लाडगावकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक श्री.गणेश ढेकळे सर यांनी मानले.

हा उपक्रम स्वयंपूर्णतेला चालना देणारा, स्थानिक खाद्यसंस्कृतीच्या जपणुकीचा एक प्रयोग, आणि आरोग्यवर्धक आहाराच्या जनजागृतीचा प्रेरणादायी प्रयत्न ठरला.

या उपक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सुप्रिया निकम (सेवानिवृत्त प्रबंधक, बँक ऑफ इंडिया; सध्या सेक्रेटरी – आर्टरुम फाउंडेशन, मुंबई; कार्यकारिणी सदस्य – मध्य मुंबई मराठी विज्ञान संघ) तसेच,पूर्ण प्राथमिक शाळा पेंढरीचे मुख्याध्यापक श्री. संतोष तांबे, पदवीधर शिक्षक श्री. संतोष राणे, श्रीमती वैशाली जायभाये, श्रीमती काळे, संस्थेचे माजी खजिनदार श्री. किरण तिर्लोटकर, माजी विद्यार्थी व आंबा व्यावसायिक श्री. उदय गुरव, तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही उपस्थिती दर्शवला.