पळसंब येथील ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ देखाव्याचे मालवण सभापतींकडून कौतुक!

 

मसुरे | झुंजार पेडणेकर :पर्यावरण रक्षण आणि पाणी बचतीचा महत्त्वपूर्ण संदेश देणारा उपक्रम राबवणे ही काळाची गरज बनली आहे. पळसंबचे सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांच्या निवासस्थानी श्री चिंतामणीच्या दर्शनादरम्यान ‘रेन हार्वेस्टिंग’ (पाणी पुनर्भरण) या समाजोपयोगी संकल्पनेवर आधारित विशेष देखावा सादर करण्यात आला आहे . या उपक्रमाचे आणि पाणी बचतीच्या संदेशाचे उपस्थित लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.

या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना पंचायत समिती सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण यांनी पाणी बचतीचे महत्त्व अधोरेखित केले. रेन हार्वेस्टिंगसारख्या संकल्पनेच्या माध्यमातून पाणी बचतीचा आणि जलपुनर्भरणाचा अत्यंत प्रभावी संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता येतो. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे समाजात जलसाक्षरता वाढीस लागून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी लोकप्रबोधन होते असे प्रतिपादन सभापती मॅडम यांनी केले.

या कार्यक्रमादरम्यान ‘रेन हार्वेस्टिंग’ या विषयावर उपस्थितांना अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विस्तृत माहिती देणाऱ्या कुमारी सानिका सावंत हिच्या विशेष कौशल्याची दखल घेण्यात आली. सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण यांच्या हस्ते सानिका सावंत हिला शाल व श्रीफळ देऊन तिच्या पुढील उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी

पंचायत समिती सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण,

उपसभापती श्री. शाम झाड,

पंचायत समिती सदस्य: सौ. भोगावकर, सौ. योजना कांबळी, श्री. संतोष गावडे, श्री. बंडू चव्हाण, श्री. गणेश तोंडवळकर, पळसंबचे सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, माजी पंचायत समिती सदस्या श्रीम. रतिका गोलतकर, पोलीस पाटील सौ. पूनम राजाराम गोलतकर,

प्रमोद सावंत, अथर्व गोलतकर, अनुज गोलतकर, शैलेंद्र अणावकर, श्यामसुंदर सावंत, राजेंद्र सावंत, दीपक सावंत, बाबा सावंत आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या या पावन पर्वात धार्मिक श्रद्धेसोबतच पर्यावरण रक्षण आणि पाणी बचतीचा सुंदर मेळ साधल्याबद्दल सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे पळसंब ग्रामस्थ व उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.