इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान येथे आयोजित वैद्यकीय शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

देवस्थान समिती व शासकिय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय संयुक्त उपक्रम

आचरा-अर्जुन बापर्डेकर
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे देवस्थान समिती च्या सहकार्याने रामेश्वर मंदिर येथे बुधवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात आरोग्य तपासणी सोबत आयुष्यमान भारत कार्ड ,जेष्ठ नागरिकांसाठी वय वंदना कार्ड काढून देण्यात आले.या उपक्रमाला देवस्थान समिती चे संजय मिराशी,कपिल गुरव मंगेश मेस्त्री यांनी भेट देऊन उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी देवस्थान कर्मचारी बाबा देसाई, रुपेश साटम यांसह शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर आदी उपस्थित होते.