आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त विनोद हुंबरे यांचा चिवेलीत सत्कार

चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील चिवेली वरची शाळेचे शिक्षक विनोद हुंबरे यांना रत्नागिरी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल यांचा सन्मान आदर्श विद्यामंदिर, चिवेली या विद्यालयाच्या वतीने राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक संजय चव्हाण यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी बोलतांना मुख्याध्यापक चव्हाण म्हणाले की, विनोद हुंबरे हे खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक आहेत. त्यांनी ज्या शाळांमध्ये काम केले त्या शाळांना आदर्श शाळा पुरस्कार मिळाले. ते अत्यंत तळमळीने विद्यार्थी घडवण्याचे काम करतात. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा, नासा परीक्षा व अन्य परीक्षामध्ये यश मिळावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले, असे ते म्हणाले. यावेळी बामणोली केंद्राच्या केंद्रसमन्वयक सौ.सोनाली सहस्त्रबुद्धे, चिवेली वरची शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूर्वा कुबडे, आदर्श विद्यामंदिर चे ज्येष्ठ शिक्षक नितीन गुरव, रियाज अत्तार, अक्षय साळवी आदी उपस्थित होते.