सन्मिल साटेलकर याची सांगली येथील विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड..

वेंगुर्ले : प्रतिनिधी

जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळविलेल्या वेंगुर्ले येथील प्रि. एम आर देसाई इंग्लिश मिडीयम स्कुल या शाळेतील इयत्ता सातवी मधील विद्यार्थी सन्मिल अजित साटेलकर याची १४ वर्षाखालील गटामध्ये सांगली येथील विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी आयोजीत जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा कणकवली येथील समर्थ मंगल कार्यालय येथे दि २६ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडली. या स्पर्धेमधून ही निवड झाली आहे.

दरम्यान विभागीय स्पर्धा सांगली येथे दि. ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडणार आहे. साटेलकर याच्या या यशामध्ये राष्ट्रीय बुद्धिबळ पंच श्री श्रीकृष्ण आडेलकर सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. सन्मिल, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे कृषी अधिकारी डॉ अजित साटेलकर यांचा मुलगा असून, त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.