नगराध्यक्षा सौ. मृणाल अभिजीत शेट्ये आणि सहकारी नगरसेवकांच्या पाठपुराव्याला यश
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि अनिकेत पटवर्धन यांचे विशेष योगदान
देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायतीच्या हद्दीतील मूलभूत सोयी -सुविधा आणि विविध पायाभूत विकास कामांसाठी ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला आहे. या निधीमुळे देवरुख शहरातील विविध विकासकामांना मोठी चालना मिळणार असून, नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांच्या विकासाला गती मिळणार आहे.
देवरूख शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांना निधी उपलब्ध व्हावा, यासाठी नगराध्यक्षा सौ. मृणाल अभिजीत शेट्ये आणि सहकारी नगरसेवकांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. शहरातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन मूलभूत सुविधा आणि पायाभूत विकासकामांना प्राधान्य मिळावे, यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत देवरुख नगरपंचायतीच्या विकासा साठी ७.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या निधीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण आणि अनिकेत पटवर्धन यांचे विशेष योगदान लाभले आहे. देवरुखच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल नगर पंचायतीच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत. या निधीतून देवरुख शहरातील मूलभूत सोयी -सुविधा, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित विविध विकास कामांना गती देण्यात येणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नगराध्यक्षा सौ. मृणाल अभिजीत शेट्ये यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस , भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण, अनिकेत पटवर्धन तसेच या पाठपुराव्यात सहभागी असलेल्या सर्व सहकारी नगरसेवकांचे आभार मानले आहेत. देवरूखच्या विकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि शासनाच्या सहकार्यामुळे विकासाची नवी दिशा निर्माण झाली असून, आगामी काळात शहरातील विविध विकासकामांना अधिक वेग मिळणार आहे.












