कायदेविषयक जनजागृती उपक्रमांतर्गत व्याख्यान संपन्न

खेड : तालुका विधी सेवा समितीच्या कायदेविषयक जनजागृती उपक्रमांतर्गत सहजीवन संस्थेच्या आय.सी.एस. महाविद्यालय, खोंडे येथे बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता कायदेविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले.
या कार्यक्रमात न्यायाधीश श्री. जी. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना ‘वैकल्पिक विवाद निवारण पद्धत आणि त्याचे फायदे’ तसेच ‘नागरिकांची मूलभूत कर्तव्ये’ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
विवाद न्यायालयाबाहेर सामोपचाराने व विविध वैकल्पिक पद्धतींच्या माध्यमातून कसे सोडविता येतात, त्याचे फायदे तसेच नागरिकांनी संविधानाने दिलेल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन का करावे, याबाबत न्यायाधीश श्री. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
मोबाईल फोनचा अविवेकी वापर सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतो.
असे सांगून सुजाण नागरिकत्व म्हणजे राष्ट्राची खरी शक्ती आहे. असेही या प्रसंगी सांगितलं.
कार्यक्रमाचे स्वागत सहजीवन संस्थेचे संचालक उत्तमकुमार जैन यांनी केले. त्यांनी तालुका विधी सेवा समितीच्या कायदेविषयक जनजागृती उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या प्राचार्या अनिता आवटी यांनी आभार मानले.प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सौ विजया भोसले यांनी केले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.