दुष्काळ जाहीर झाल्याने, सरसकट नुकसान भरपाईचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश !
शंकांचे निरसन ! शेतकरी बागायतदारांमध्ये आशेचा किरण
फोंडाघाट : पावसाच्या ओढीमुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे फोंडाघाट पंचक्रोशीतील शेती पूर्णतः करपून गेली. खाचरातील पाणी आटल्याने, जमिनीला तडे गेले आहेत. काही ठिकाणी भात पोसवलेले नाही. तर काही ठिकाणी भाताचा दाणा काळा होऊन, त्याचा काही उपयोग होणार नाही. या अवकृपेमुळे येथील शेतकरी पूर्ण खचला असून मदतीकडे डोळे लावून बसला आहे..
त्यातच महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग दुष्काळी जिल्हा जाहीर केल्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी जि.प./पं. स. सदस्य आणि स्थानिक पुढारी यांना प्रत्येक गावागावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधा. प्रशासनाची भूमिका स्पष्ट करून शंकांचे निरसन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कृषी अधिकारी आणि सहाय्यकांना प्रत्येक शेतीचा सरसकट नुकसान भरपाई चा पंचनामा करून, तो अहवाल तातडीने सादर करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत ..
त्याप्रमाणे अखेर भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, जि.प.सदस्य मनोज रावराणे, प स.सदस्य पवन भालेकर, उपसरपंच तनवी मोदी, मिलिंद लाड,माजी सभापती सुजाता हळदिवे, सभापती सोनू सावंत, नितीन पालकर,रुपेश चव्हाण,विश्वनाथ जाधव, मंडळ कृषी अधिकारी झुल्फे,, उपकृषी अधिकारी वेर्लेकर, सहाय्यक कृषी अधिकारी अक्षया परब, इत्यादींनी फोंडाघाट, गांगोवाडी,पिंपळवाडी, मारुतीवाडी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वाड्यांच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्यांशी संवाद साधला. आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून लवकरच पंचनामे होऊन नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खाती जमा होईल,असा विश्वास दिला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून शेतकरी बागायतदारांना आशेचा किरण दिसत आहे..












