मंडणगड प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यातील तिडे आदिवासीवाडी येथून एक महिला बेपत्ता झाले असून, त्यांच्याबाबत कोणालाही माहिती मिळाल्यास संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मंडणगड तालुक्यातील तिडे आदिवासीवाडी येथील ताई शांताराम जाधव (वय ५६) या २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचे वर्णन खालीलप्रमाणे आहे: उंची : ४ फूट ३ इंच वर्ण : निमगोरा, चेहरा गोल, नाक सरळ आणि डोळे काळेपोशाख : लाल रंगाची साडी व त्यावर पिवळ्या रंगाचा बारीक फुलांची नक्षी असलेला ब्लाऊज गळ्यात काळ्या मण्यांचे मंगळसूत्र
या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ मंडणगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे












