जांभवडे पंचक्रोशीत वन्यजीव सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात
कुडाळ : माध्यमिक शिक्षण समिती जांभवडे पंचक्रोशीचे चेअरमन सुभाष मडव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेत वन्यजीव सप्ताहानिमित्त वन्यजीव संरक्षण व संवर्धन जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
१ ऑक्टोबर रोजी आयोजित या कार्यक्रमात सोमनाथ पाटील यांनी विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षण, संवर्धन तसेच पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी त्यांनी जंगलातील विविध पक्षी व प्राण्यांचे आवाज काढून विद्यार्थ्यांना त्यांची ओळख करून दिली. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी कुतूहल निर्माण झाले तसेच निसर्ग आणि वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व समजण्यास मदत झाली.
यावेळी दळवी सर व त्यांच्या टीमनेही विद्यार्थ्यांना वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रशालेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक अनिल कासले, पर्यवेक्षक सावंत सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. ज्ञानवर्धक आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.













