विशेष कार्यकारी अधिकाऱ्याच्या यादीत सैतवडे गावाला वगळल्याने नाराजी

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या निवडी घोषित करण्यात आला. या निवडीत बहुतांश गावांतील एकाला संधी देण्यात आली असली तरी रत्नागिरीतील सैतवडे गावाला या पदासाठी न देण्यात आल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय 31 डिसेंबर 2015 व 15 मार्च 2016 च्या शासन निर्णयानुसार रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील व रत्नागिरी शहरातील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्धी करण्यात आली. या यादीत रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गावाला वगळण्यात आले. सैतवडे गाव हा महसूल गाव म्हणूनही ओळखला जातो. या गावाचे नाव विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या यादीत का म्हणून नाही असा प्रश्न आता येथील ग्रामस्थ स्थानिक लोक्रतिनिधीना विचारू लागले आहेत.

 

गेल्या पाच ते सहा वर्षापासून गावाला विशेष कार्यकारी अधिकारी पदाची प्रतिक्षाच होती. यावेळी ही कमतरता भरून निघेल असा विश्वास ग्रामस्थांना होता. मात्र ग्रामस्थांच्या अपेक्षा पूर्णतः फोल ठरल्या आहेत.

एखादी निवडणूक लागली की उमेदवार आणि कार्यकर्ते हक्काने या गावामध्ये येऊन आपापल्या परीने आपला उमेदवार कसा योग्य आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात. पण अशावेळी कुठल्याच राजकीय पक्षाने किंवा भावी उमेदवाराने आत्तापर्यंत या यादीबद्दल एक शब्दह सुद्धा न काढल्याने ग्रामस्थ नाराज झाले आहेत. सैतवडे गावाकडेच एवढे दुर्लक्ष का? याचे उत्तर इथल्या स्थानिक लोकपरतिनिधींनी देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.