मंडणगड | प्रतिनिधी : ही आरोग्य तपासणी मंडणगड ता.विकास मंडळ-F-1428, मुंबई संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे पार पडली. महाविद्यालयाच्या सखी सावित्री समिती अंतर्गत ही आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली होती. या आरोग्य तपासणीमध्ये तब्बल 185 विद्यार्थिनींच्या हिमोग्लोबिन मोफत तपासण्यात आले. यासाठी पंदेरी पीएसी आरोग्य अधिकारी डॉ. सौ.शुंभागिनी अमित गिरासे व त्यांचे सहकारी यांचे सहकार्य लाभले.डाॅ.सौ.शुभांगिनी गिरासे यांनी विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींना समुपदेशन करणाऱ्या पोलीस महिला प्रतिनिधी सौ.वैशाली चव्हाण तसेच सखी सावित्री समितीच्या सदस्या सौ.मानसी गोसावी,सौ.तन्वी जाधव यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री खाडे सर, उपप्राचार्य श्री.हुल्लोळी सर तसेच सखी सावित्री समिती प्रमुख सौ.विद्या आटपाडकर यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.आटपाडकर मॅडम,केंद्रे सर,श्री याचावाड सर आणि श्री नंदू दळवी यांचे सहकार्य लाभले.
Home ताज्या घडामोडी सखी सावित्री समिती अंतर्गत विद्यार्थिनींचे मोफत हिमोग्लोबिन तपासणी व आरोग्य शिक्षण मार्गदर्शन...












