रत्नागिरी:
सध्याच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असून उपचारांचा खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नाही. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनता उपचारासाठी शासकीय रुग्णालयांवर अवलंबून असते. परंतु, जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता आणि औषधांचा तुटवडा यांमुळे गंभीर रुग्णांना रत्नागिरी, कोल्हापूर किंवा मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये पाठवले जाते. तेथे खासगी रुग्णालयांकडून अवाढव्य बिल आकारले जात असल्याने अनेकदा उपचारांअभावी रुग्णांचे प्राण जात आहेत.
सर्वसामान्य जनतेचा एकमेव आधार असणारे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयच आजाराने ग्रासल्यासारखे झाले असून, त्याला शासन-प्रशासनाचा भक्कम आधार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी या गंभीर प्रश्नावर तातडीने लक्ष घालून जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा सुधारण्यात यावी, अशी आक्रमक मागणी भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्हा दक्षिण उपाध्यक्ष श्री. अशोक गणपत वाडेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या गंभीर समस्येची दखल घेऊन सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जनतेमधून जोर धरत आहे. या निवेदनाच्या प्रति माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
Home महत्वाच्या बातम्या रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या अनास्थेबाबत भाजपचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; खासगी रुग्णालयांच्या अवाढव्य बिलांमुळे नागरिक...











