सत्याग्रहींना श्रद्धांजली; महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन
वेंगुर्ले : दाजी नाईक
शिरोडा मिठाचा सत्याग्रह स्थळी आज, शुक्रवार दि. २ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना प्रथम स्थान देत ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यात आला. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. यावेळी सत्याग्रहाच्या वेळी देशासाठी आहुती दिलेल्या सत्याग्रहींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मानवंदनेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात गुरु. अ. वि. बावडेकर विद्यालय, शिरोडा, सेंट्रल प्रायमरी स्कूल शिरोडा नंबर १ प्राथमिक शाळा, शाळा नंबर १ गावडेवाडी तसेच पूर्ण प्राथमिक खर्डेवाडी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
शिरोडा ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश उर्फ बड्या परब यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानले. ऐतिहासिक सत्याग्रह स्थळावरील या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना सत्याग्रहींच्या त्यागाची आठवण झाली.
दरम्यान, सत्याग्रह स्थळी आता श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली आहे.













