श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखच्यावतीने वार्षिक सभेत यशस्वी सभासद व कुटुंबियांचा गौरव

देवरूख (प्रतिनिधी):

श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. इतिवृत्त व अहवाल वाचन वाचनालयाचे कार्यवाह प्रा. संदीप मुळ्ये यांनी केले. वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी यांनी प्रास्ताविक व सद्यस्थितीतील वाचनालयातील उपक्रम व भविष्यामध्ये करावयाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. सभासदांनी विचारलेल्या विविध विषयावरील प्रश्नांबाबत सविस्तर व समर्पक माहिती दिली.

वार्षिक सर्वसाधारण सभेचा प्रारंभ मान्यवरांनी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने केला. यानंतर प्रा. गजानन जोशी यांनी यशस्वी सभासद व कुटुंबियांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन, गौरव करण्यामागील उद्देश व महत्व याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर ग्रंथपाल श्रद्धा आमडेकर यांनी सत्कारमूर्तींच्या नावांचे वाचन केले. सद्गुरु लोकमान्य वाचनालयाच्यावतीने गौरविण्यात आलेल्या सन्माननीय सदस्य व कुटुंबांची नावे पुढीलप्रमाणे: १. सौ. मृणाल शेट्ये(नगराध्यक्षा, देवरुख), २. सौ. स्वाती राजवाडे(नगरसेविका), ३. सौ. श्रद्धा इंदुलकर(नगरसेविका), ४. सौ. नेहा आंबेकर(नगरसेविका), ५. श्री. दीपक खेडेकर(नगरसेवक),६. श्री. सिद्धेश वेल्हाळ (नगरसेवक), ७. श्री. प्रमोद अधटराव(रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य), ८. डॉ. अभिमन्यू शिंदे(सेवानिवृत्त, केंद्रप्रमुख), ९. प्रा. डॉ. श्री. सुभाष मांयगडे(ग्रंथपाल, आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख), १०. युयुत्सू आर्ते(सामाजिक कार्यकर्ते), ११. श्री. प्रकाश घस्ते(निवृत्त शासकीय अधिकारी), १२. श्री. मधुकर कोकणी(मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख), १३. श्री. श्रीकृष्ण जागुष्टे(निवृत्त शिक्षक), १४. सौ. श्रद्धा आमडेकर(ग्रंथपाल,श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुख).