कळकवणे शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात

मंडणगड प्रतिनिधी  : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळकवणे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना सत्य, अहिंसा, साधेपणा, शिस्त, प्रामाणिकपणा आणि देशसेवेचे महत्त्व समजावून सांगितले.

यावेळी शिक्षणप्रेमी तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेक माजी मुख्याध्यापक मोतीलाल पाटील यांनी दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना अल्पोहार व खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी नव्याने नियुक्त पदवीधर शिक्षक हेमंत पवार व देव्हारे केंद्रशाळेचे माजी मुख्याध्यापक मोतीलाल पाटील यांचेही
कार्यक्रमास शिक्षणप्रेमी तथा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर,शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पाटील, देव्हारे जि.प.केंद्रशाळेचे माजी मुख्याध्यापक मोतीलाल पाटील, पदवीधर शिक्षक हेमंत पवार,अंगणवाडी सेविका भारती पवार, तसेच विद्यार्थी रियांश पवार, शुभ्रा पवार, मानस पवार, सार्थक पवार, आयुष पवार आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रपुरुषांच्या विचारांची प्रेरणा निर्माण करणारा आणि शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.