सिंधू. वैश्य समाज पतसंस्था आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप.सोसायटी लि.कडून दळवी यांचा सत्कार !
फोंडाघाट; फोंडाघाट लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसा. लि.या बँकिंग संस्थेची प्रामाणिक आणि निष्ठेने सेवा दिल्याबद्दल ,शाखा व्यवस्थापक सुनील दत्त दळवी यांचा श्रीफळ- शाल आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वांनी दळवी यांच्या बँके प्रति झोकून देऊन काम करण्याचा स्वभाव आणि लोकाभिमुख कामाचे कौतुक करून, बँकेसाठी आणि ग्राहकांसाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले. आणि शुभेच्छा दिल्या.
श्री. सुनीलदत्त दळवी यांनी गेली १० वर्षे लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. या संस्थेशी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे जोडलेले राहून आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटविला.कणकवली तसेच फोंडाघाट शाखेचे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना, त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा, कार्यक्षमतेचा आणि नेतृत्वगुणांचा उपयोग करून संस्थेच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले. शाखेतील सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करताना संस्थेच्या उद्दिष्टांना नेहमीच प्राधान्य दिले.सावंतवाडी रिजनच्या प्रगतीच्या प्रवासात त्यांचा मोठा आणि महत्त्वपूर्ण वाटा आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी संस्थेच्या व्यवसायवृद्धी बरोबरच, ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आणि सहकाऱ्यांसाठी एक अनुभवी मार्गदर्शक म्हणूनही भूमिका बजावली.आज ते लोकमान्य परिवारातून सेवानिवृत्त होत असताना, त्यांच्या योगदानाची आठवण प्रत्येक सहकाऱ्याच्या मनात कायम राहील. संस्थेच्या वाटचालीतील त्यांचे अमूल्य योगदान सगळ्यांसाठी मार्गदर्शक आहे. संस्थेला दिलेली १० वर्षांची निष्ठावान सेवा, अनुभव आणि मार्गदर्शन ही लोकमान्य परिवारासाठी कायमच प्रेरणादायी राहील.
अशा शब्दात बँकेच्या सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोकमान्य परिवारात गेली दहा वर्ष कणकवली- फोंडाघाट येथे माझ्या अनुभवाचा कार्यप्रणालीचा उपयोग करून, जो सन्मान दिलात तो माझ्या भावी आयुष्यात प्रेरणादायी आणि सुखावह राहील अशी ग्वाही आपल्या मनोगतात दळवी यांनी व्यक्त करताना,आपल्या अनुभवाच्या विचारांना वाट करून दिली…













