परुळेबाजार येथे वनराई बंधारे बांधणे मोहिमेचा शुभारंभ..

परुळे : प्रतिनिधी

ग्रामपंचायत परुळेबाजार व पंचायत समिती वेंगुर्ल यांच्या वतीने जिल्हा प्रशासनच्या हाकेला प्रतिसाद देत वनराई बंधारे मोहिमेचा शुभारंभ परुळे येथे करण्यात आला.

दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाणी टंचाई वर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने जास्तीत जास्त बंधारे बांधून पाणी साठवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद देत परूळेबाजार ग्रामपंचायत ने परिसरात बंधारे बांधण्याचा शुभारंभ केला आहे. यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच प्राजक्ता पाटकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री अभय परुळेकर, संजय दूधवडकर, पोलीस पाटिल संदेश पवार यासह महिला बचत गट प्रतिनिधी दिपा चव्हाण, मजुंषा चव्हाण, अंगणवाडी सेविका देसाई, राऊळ मॅडम, वराडकर मॅडम व ग्रामस्थ ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे उपस्थित होते.