रत्नागिरीत पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत ‘शिव योगा क्लासेस’चा शानदार डंका; २० पदकांसह घवघवीत यश!

रत्नागिरी:

दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी बाळासाहेब पित्रे योग संशोधन प्रशिक्षण केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धा २०२६-२७ अतिशय उत्साहात संपन्न झाल्या. १४, १७ व १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या विविध गटांत पार पडलेल्या या स्पर्धांमध्ये ‘शिव योगा क्लासेस’च्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत १२ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण २० पदके पटकावून घवघवीत यश संपादन केले.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील १४, १७ व १९ वर्षाखालील मिळून किमान १५० खेळाडूंनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता.

स्पर्धेत पदक पटकावलेले यशस्वी खेळाडू:

 १४ वर्षाखालील मुली:

 दुर्वा अमोल साळवी: पारंपारिक एकल (Traditional Individual) – प्रथम | कलात्मक एकल – प्रथम

 तृष्णा कमलेश शिरधनकर: पारंपारिक एकल – द्वितीय

 दुर्वा साळवी व तृष्णा शिरधनकर: कलात्मक युगल – प्रथम

 १४ वर्षाखालील मुले:

 समर्थ विनय कोरगावकर: पारंपारिक एकल – तृतीय | कलात्मक एकल – प्रथम

 समर्थ कोरगावकर व शौर्य मगदूम: कलात्मक युगल – द्वितीय

 १७ वर्षाखालील मुले:

 सोहम विजय बंडबे: पारंपारिक एकल – द्वितीय | कलात्मक एकल – द्वितीय

 १७ वर्षाखालील मुली:

 सौम्या देवदत्त मुकादम: पारंपारिक एकल – प्रथम | कलात्मक एकल – तृतीय

 १९ वर्षाखालील मुली:

 राधिका मंदार पेडणेकर: पारंपारिक एकल – प्रथम | कलात्मक एकल – प्रथम

 राधिका पेडणेकर व सलोनी शिर्के: कलात्मक युगल – प्रथम

 १९ वर्षाखालील मुले:

 प्रतिक पुरंदर पूजारी: पारंपारिक एकल – प्रथम | कलात्मक एकल – प्रथम

 आर्य दिनेश हरचकर: पारंपारिक एकल – द्वितीय

 रत्नेश हितेश आडिवरेकर: पारंपारिक एकल – तृतीय

 प्रतिक पूजारी व रत्नेश आडिवरेकर: कलात्मक युगल – प्रथम

 रत्नेश आडिवरेकर व आर्य हरचकर: कलात्मक युगल – प्रथम

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिव योग क्लासेसचे प्रमुख श्री. दुर्वांकुर चाळके सर, रा. भा. शिर्के प्रशाला गुरुकुलचे प्रमुख श्री. किरण सनगरे सर तसेच जी.जी.पी.एस शाळेच्या योगा शिक्षिका सौ. श्रद्धा जोशी मॅडम यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.