सावंतवाडी । प्रतिनिधी:
जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ, सावंतवाडीच्या कबड्डी खेळाडूंची सिंधुदुर्ग फेडरेशनच्या अंडर-२० संघात निवड झाली असून हा संघ पालघर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथील कबड्डी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवडेकर, भारतीय राष्ट्रीय खेळाडू सागर बांदेकर, विजय जाधव, गणेश जाधव तसेच जय महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे खेळाडू उपस्थित होते.
सिंधुदुर्ग फेडरेशनच्या अंडर-२० संघातून पालघर येथे खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी व सावंतवाडी नगरपरिषदेच्यावतीने सर्व खेळाडूंना आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा देत उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहन देण्यात आले.












