तुळस येथील भजन स्पर्धा आता कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचा उत्सव ठरत आहे : जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत 

प्रदेशाध्यक्ष चषक राज्यस्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे शानदार उद्घाटन….

भक्ती, संगीत आणि कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा तुळस येथे सुरेल संगम..

वेंगुर्ले : दाजी नाईक 

एखादी स्पर्धा भरवणे आणि कि दरवर्षी सातत्याने सुरू ठेवणे फार मोठी गोष्ट आहे. तुळस सारख्या ग्रामीण भागात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सलग दुसऱ्या वर्षी भव्य दिव्य स्वरूपात राज्यस्तरीय भजन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतून राज्यभरातील भजनी कलाकारांची कला आम्हा सर्वांना पाहता येणार आहे. सर्व स्पर्धकांना भाजपातर्फे खूप शुभेच्छा देऊन भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आयोजकांच्या आयोजनाचे कौतुक केले. तसेच ही स्पर्धा केवळ विजेतेपदापुरती मर्यादित न राहता कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचा उत्सव ठरत आहे असे सांगितले.भारतीय जनता पार्टी तुळस आणि आर.सी. ग्रुप, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’ या राज्यस्तरीय निमंत्रित संगीत भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रभाकर सावंत बोलत होते.

वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील कर्मयोगी कै. रामचंद्र य. तुळसकर सभागृह, श्री शिवाजी हायस्कूल येथे दोन दिवस ही स्पर्धा होत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील निमंत्रित भजन मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भाजप युवा नेते विशाल परब, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता ताई कोरगावकर, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, उद्योजक सुधीर झांट्ये, वेंगुर्ला भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, सरचिटणीस वसंत तांडेल, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, जैतिराश्रित संस्था अध्यक्ष विष्णू परब, मंगेश राऊळ, देवस्थान मानकरी अनिल परब, पोलीस पाटील सागर सावंत, परीक्षक दीपेश मेस्त्री, मोहन मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना विशाल परब यांनी मार्गदर्शन करताना “भजन ही केवळ करमणुकीची कला नसून संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेची वाहक आहे. पारंपरिक भजनी मंडळी या कलेच्या माध्यमातून आपला सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवत आहेत. हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे सांगितले.

*संगीत जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध*

स्पर्धेच्या सुरुवातीला झालेल्या विशेष संगीत जुगलबंदी कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. पुरुषोत्तम परब, अमित तांबोळकर आणि विशाल घोगळे यांच्या सुरेल सादरीकरणाला पखवाज वादक भावेश राणे आणि तबला वादक ओंकार मेस्त्री यांनी साथ दिली. या जुगलबंदीने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करत उत्स्फूर्त दाद मिळवली.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुधीर झांट्ये, प्रमोद गोळम, पिंट्या राऊळ, विजय रेडकर, तेजस कुंभार, किशोर सावंत, सुभाष सावंत, राजेश भणगे, रत्नाकर शिरोडकर, बंड्या होडावडेकर, उमेश कुंभार, संतोष सावंत, वैभव होडावडेकर, नंदू बेहेरे, शुभम शेटकर, सिद्धेश शेटकर, नितीन कोचरेकर, पप्पू सावंत, बाबा राऊळ, रोहन सावंत, पुरुषोत्तम परब, नाथा परब, भैय्या घोगळे, आनंद माळकर, दत्ताराम माळकर, राजेश तुळसकर, हर्ष होडावडेकर, हनू गावडे, करण परब, घनश्याम गावडे, आनंद होडावडेकर, भक्ती भणगे, नाथा पांगम, समीर तांबोसकर आणि दाजी चुडजी यांच्यासह भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. वैभव खानोलकर, सह सूत्रसंचालक अजय नाईक यांनी केले, तर आभार विजय रेडकर यांनी मानले.