मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवमध्ये गोगटेच्या शास्त्रीय गायन मध्ये तन्वी मोरे हिने रौप्य पदक पारितोषिक पटकावले.

रत्नागिरी : 
५९ व्या आंतर महाविद्यालय सांस्कृतिक युवा महोत्सव साठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या अंतिम फेरीमध्ये
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात शास्त्रीय गायन स्पर्धेत रौप्य तन्वी मोरे हिने पदक पटकावले आहे .
तन्वी मोरे हिचे गुरू आणि मार्गदर्शक – सौ. विनया परब ( रत्नागिरी)
साथीदार – स्वरूप नेने ( तबला), श्रीरंग जोगळेकर (हार्मोनियम) केले आहे.

सदर यशस्वी विद्यार्थिनीचे प्राचार्य डॉ
मकरंद साकळकर प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई ,कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये ,वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ.सीमा कदम ,विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी अभिनंदन केले आहे.