जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत ज्ञानदीप भडगावच्या मुग्धा घाग व पूर्वा दळवी ला सुवर्णपदक

खेड(प्रतिनिधी) भारत सरकार व जिल्हास्तरीय वुशू संघटना रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वुशू निवड चाचणी स्पर्धा २३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथे पार पडली या मध्ये ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेतील इ. ८ वी तील मुग्धा उदय घाग व इ. १२ वी विज्ञान मधील पूर्वा अमोल दळवी यांनी सुवर्णपदक प्राप्त केले

त्यांची पुढील पनवेल येथे होणाऱ्या महाराष्ट्र वुशू आयोजित राज्यस्तरीय खेलो इंडिया दस का दम महिला वुशू लीग स्पर्धेकरिता निवड झाली आहे. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक संतोष भोसले यांनी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लढढा, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य भालचंद्र कांबळे, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.