वैभववाडी प्रतिनिधी :
फोंडा-वैभववाडी मार्गावर लोरे येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. लोरे येथील वैशाली रावराणे यांच्या घरासमोर ही घटना घडली. झाड रस्त्यावर आडवे पडल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच लोरेचे माजी सरपंच महेंद्र रावराणे, रितेश सुतार, छोटू रावराणे, मंदार रावराणे, दीपक रावराणे, आदित्य रावराणे, संतोष गुरव यांच्यासह ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करत मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. त्यामुळे काही काळ ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
ग्रामस्थांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठी गैरसोय टळली असून, त्यांच्या या कार्याचे वाहनचालकांकडून कौतुक करण्यात आले.











