आंबडोस येथे आत्मा अंतर्गत शेती शाळेस प्रतिसाद!

मसुरे | झुंजार पेडणेकर
उष्ण दमट व ढगाळ हवामान हे नेहमीच किडींच्या प्रादुर्भावाचे महत्त्वाचे कारण होत असते. काजू पिकावर प्रामुख्याने येणाऱ्या ढेकण्या तसेच फुलकिडी या प्रमुख किडींच्या व्यवस्थापनासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच कृषी विभाग शिफारस करीत असलेल्या वेळापत्रकाचा शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्ण अवलंब करावा. जेणेकरून या किडींपासून होणारा आर्थिक तोटा टाळता येईल असे प्रतिपादन डॉ. गोपाळ गोळवणकर यांनी आंब lडोस तालुका मालवण येथे शेतकरी शेती शाळेत मार्गदर्शन करताना केले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सिंधुदुर्ग व तालुका कृषी अधिकारी मालवण कार्यालय यांच्या वतीने रब्बी हंगामामध्ये काजू पिकावरील शेतकरी शेती शाळेचे आयोजन आंबडोस येथे करण्यात आले आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री अमोल करंदीकर यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले. उप कृषी अधिकारी श्री धनंजय गावडे यांनी प्रास्ताविकामध्ये शेती शाळेचा उद्देश स्पष्ट केला तसेच महाविस्तार ॲप चा वापर करण्याचे आवाहन केले. मालवण शेतकरी सल्ला समितीच्या सदस्य सौ. राधा वरावडेकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या तर आंबडोस सरपंच सौ. सुबोधिनी परब यांनी या शेती शाळेचे आंबडोस गावात आयोजन केले बाबत कृषी विभागाला धन्यवाद दिले.

शेती शाळेचे आयोजन तसेच आभार प्रदर्शन कृषी सेवक श्रीम. स्नेहा खोत यांनी केले.