आचरा l प्रतिनिधी :आचरा येथील श्री नामदेव शंकर कावले इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रमुख देणगीदार व सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या श्रीमती मानसी नामदेव कावले यांचे रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथे दुःखद निधन झाले.
पती श्री. नामदेव शंकर कावले यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, या भावनेतून त्यांनी आचरा येथील शिक्षण क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेली इंग्लिश मीडियम स्कूलची वास्तू त्यांच्या कार्याची कायमस्वरूपी स्मृती म्हणून आचरा परिसरात उभी आहे.
त्यांच्या निधनाने आचरा पीपल्स असोसिएशन, शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक व आचरा परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व आप्तेष्ट असा परिवार आहे. आचरा पीपल्स असोसिएशनच्या वतीने कार्याध्यक्ष प्रदिप प्रभूमिराशी यांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी संस्थेच्या तिन्ही शाखा बंद ठेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.












