खास महिलांसाठी तालुकास्तरीय अभिनव स्पर्धा
संतोष कोत्रे
लांजा :- वाचनालय लांजे या संस्थेतर्फे लांजा तालुक्यातील महिलांसाठी खास पाककृतीतून साकारु साहित्यकृती या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
नवरात्रौत्सवानिमित्त ही अभिनव स्पर्धा शनिवार दि. १७ ऑक्टोबर रोजी सायं.३.०० वा. माऊली सभागृह लांजा येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत महिलांना दोन पाककृती सादर करावयाच्या आहेत.कोणताही एक “शाकाहारी पदार्थ” व दुसरा “चिमुकल्यांच्या डब्यासाठी पौष्टिक पदार्थ” घराकडून तयार करून आणावयाचे आहेत. सोबत त्या रेसिपीविषयी लेख किंवा कविता अथवा पदार्थाविषयी आठवण शब्दबद्ध करुन पाककृतीसोबत सादर करावी.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी लोकमान्य वाचनालय संचालिका डॉ. सौ.विजयालक्ष्मी देवगोजी ९९७०५६७६३२ किंवा सौ. ललिता भिंगे ९४२३२९५३९८ यांच्याशी संपर्क साधावा.इच्छुक स्पर्धकांनी नावनोंदणी दि.१५ऑक्टोबर पर्यंत लोकमान्य वाचनालय लांजे किंवा वरील संपर्क क्रमांकावर करावी.
या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक रोख रु १५००/- व पुस्तक, द्वितीय क्रमांक रोख रु . १०००/- व पुस्तक, तृतीय क्रमांक रोख रु.७५०/- व पुस्तक, उत्तेजनार्थ रोख रु.५००/- व पुस्तक अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
तरी या स्पर्धेत तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होवून आपल्या हातच्या चवीतून साकारलेल्या पाककृतीला साहित्यातून शब्दबद्ध करावे, असे आवाहन लोकमान्य वाचनालय लांजेचे अध्यक्ष ॲड. अभिजीत जेधे, उपाध्यक्ष योगेश वाघधरे, कार्यवाह उमेश केसरकर यांनी केले आहे.













