दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपक्रम
वैभववाडी | प्रतिनिधी : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी तिथवली ग्रामपंचायतीच्या वतीने वनराई बंधारा घालण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नासिरभाई काझी यांच्या पुढाकारातून हा बंधारा उभारण्यात आला. या उपक्रमामुळे पावसाचे पाणी अडवून त्याचा उपयोग शेती तसेच ग्रामस्थांच्या विविध गरजांसाठी होण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नासिरभाई काझी, पालक मित्र तिथवली गवारी साहेब, उपअधीक्षक भूमी अभिलेख, सरपंच प्रियांका हरयाण, सोसायटीचे चेअरमन ब्रह्म हरयाण, ग्रामपंचायत सदस्य ओंकार हरयाण, रेहाना काझी, सीआरपी प्रशाली तांबे, अंगणवाडी सेविका साक्षी हरयाण, नम्रता गाडगे, रोहिणी कुडाळकर, ग्रामसेवक गजानन कोलते, महादेव हरयाण, गुलजार काझी, रहुफ काझी, तंटामुक्त समिती अध्यक्ष जयराज हरयाण, प्रशांत हरयाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.











