शाळा भेटींसह ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचा घेणार आढावा
रत्नागिरी (प्रतिनिधी) :
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. या एकदिवसीय दौऱ्यादरम्यान ते जिल्ह्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देणार असून ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेणार आहेत.
मंत्री भुसे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन होणार आहे. तर दुसर्या दिवशी
-
सकाळी ८ ते दुपारी १२ : जिल्ह्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील शैक्षणिक सोयीसुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि गुणवत्तेची पाहणी.
-
दुपारी १ वाजता : रत्नागिरी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाची आढावा बैठक. या बैठकीत शिक्षण विभागातील विविध योजनांच्या अंमलबजावणीवर चर्चा होणार आहे.
-
सायंकाळी ५.३० वाजता : शासकीय विश्रामगृहावरून रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे प्रयाण.
-
सायंकाळी ६.१० वाजता : करमाळी-एलटीटी (LTT) एक्सप्रेसने पनवेलकडे प्रयाण.
शिक्षण मंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे स्थानिक शिक्षण वर्तुळात हालचालींना वेग आला असून, शाळा भेटी आणि जिल्हा परिषद सभागृहातील आढावा बैठकीची जोरदार तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.












