गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन व ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संगमेश्वर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादीत करून ,अनेक स्पर्धात बाजी मारली आहे.
यामध्ये ३००० मी धावणे मध्ये
दर्पण कातकर द्वितीय
केदार धामणकर तृतीय क्रमांक पटकावला,३००० मीटर चालणे प्रकारात प्रज्ञा हेमण प्रथम आली.
१०० मीटर धावणे मध्ये
कृतिका गोताड प्रथम,लांब उडी
जान्हवी गोताड प्रथम,४०० मीटर धावणे रिया गोटेकर तृतीय,४०० मीटर रिले मुलींच्या संघात रिया गोटेकर,स्वरा गुरव
जान्हवी गोताड,कृतिका गोताड
अडथळा शर्यतीत जान्हवी गोताड द्वितीय,थाळी फेक
तन्वी जौरत तृतीय,हॅमर थ्रो प्रकारात तन्वी जौरत प्रथम आली.विद्यार्थ्यांना अभिजित सुर्वे,आणि प्रशालेत यापूर्वी कार्यरत असलेल्या करीदा शिक्षक निखिल वारके यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक महादेव परब ,संस्था अध्यक्ष शशिकांत घाणेकर,सचिव श्रीकांत फाटक व अन्य संचालकांनी अभिनंदन केले आहे.













