बाणकोट जिल्हा परिषद गटाची प्रभाग समिती बैठक उत्साहात संपन्न

२९ विभागांच्या कामकाजाचा खातेनिहाय आढावा; प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना

मंडणगड, प्रतिनिधी  : बाणकोट जिल्हा परिषद गटाची प्रभाग समिती बैठक शिवसेना मंडणगड तालुकाप्रमुख तथा रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज देव्हारे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस प्रशासकीय यंत्रणाकील विविध विभागांचे तब्बल २९ खातेप्रमुख उपस्थित होते. अध्यक्ष प्रताप घोसाळकर यांनी प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा खातेनिहाय आढावा घेतला. यामध्ये सुरू असलेली विकासकामे, प्रलंबित कामे, नागरिकांच्या समस्या तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
बाणकोट जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि स्थानिक विकासकामांना प्राधान्य देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करून विकासकामांना गती देण्याचे निर्देश प्रताप घोसाळकर यांनी संबंधित विभागांना दिले. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
बाणकोट जिल्हा परिषद गटातील विकासकामांचा सातत्याने आढावा घेत नागरिकांना शासनाच्या विविध योजना व विकासकामांचा प्रभावी लाभ मिळवून देण्यासाठी प्रभाग समिती कार्यरत राहील, असा विश्वास अध्यक्ष प्रताप घोसाळकर यांनी व्यक्त केला.
बैठकीस पंचायत समिती मंडणगडचे उपसभापती दीपक मालुसरे, शिवसेना पंचायत समिती गटनेते अनिल रटाटे, पंचायत समिती सदस्या दीप्ती घडशी, शिवसेना तालुका समन्वयक जितेंद्र दवंडे, उपतालुकाप्रमुख संजीव येसावरे, हरिश्चंद्र कोदेरे, ज्येष्ठ शिवसैनिक इस्माईल ई उंडरे, विभागप्रमुख संजय शेडगे, इरफान बुरोंडकर, उपविभागप्रमुख राम जगताप, भूपेंद्र बोर्ले, विभाग संघटक निलेश रक्ते, उपसंघटक संजय बोथरे, वसीम चिपोलकर, विधानसभा सोशल मीडिया प्रमुख उमेश घागरूम, महिला विभाग संघटक भाविका बोबले, उपविभाग संघटक सुप्रिया माळी, युवासेना उपतालुका अधिकारी रूपेश निगुडकर, विभाग अधिकारी किरण भागणे देव्हारे सरपंच प्रमिला दळवी, निगडीच्या सरपंच सौ. कोंडेकर शिगवण, सरपंच दीपिका जाखल, वेसवीच्या सरपंच प्रवीणा खाडे, तोंडलीच्या सरपंच चंद्रभागा जाधव, वेरळचे सरपंच उदय जोशी बाणकोटचे सरपंच नुरुल्ला परकार यांयांच्यासह युवासैनिक ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.