गुहागर प्रतिनिधी :
सेवा संकल्प अभियान अंतर्गत तालुका आरोग्य विभाग पंचायत समिती आणि ग्रामीण रुग्णालय गुहागर यांच्या मार्फत तालुकास्तरीय रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
वया शिबिराची सुरुवात पंचायत समिती गुहागर सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती नीलेश सुर्वे, तहसीलदार परीक्षित पाटील, गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दीप प्रज्वलन करून केली.
या रक्तदान शिबिरासाठी सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथील पथक आले होते.
आरोग्य शिबिरात रक्तदाब, मधुमेह तपासणी करण्यात आली. ई सी जी करण्यात आले.
प्रधानमंत्री मंत्री जन आरोग्य योजना कार्ड साठी ई के वाय सी करण्यात आले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ घनश्याम जांगीड आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ सत्यार्थ प्रकाश बळवंत, ग्रामीण रुग्णालय गुहागर येथील कर्मचारी आणि तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांनी अथक परिश्रम घेतले.













