नगरसेवक महेश कोयंडे यांचे सामाजिक सेवा कार्य 

प्रभाग ९ हिंदळेकरवाडी येथे स्वखर्चाने बेंच उपलब्ध 

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद प्रभाग ९ येथील शिवसेना नगरसेवक महेश कोयंडे यांनी ज्येष्ठ नागरिक यांच्या मागणीनुसार हिंदळेकर वाडी येथे स्वखर्चाने बेंच उपलब्ध करून दिला आहे.

 

नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी यापूर्वी एक बेंच त्यांनी बसवून घेतला होता. मात्र त्या ठिकाणी आणखी एक बेंच असावा अशी मागणी स्थानिक ज्येष्ठ नागरिक यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्या मागणीची दखल घेत नगरसेवक महेश कोयंडे यांनी स्वखर्चातून आणखी एक बँक उपलब्ध करून दिला आहे. त्याबाबत नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.