माखजन:
असंख्य भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या चिपळूण च्या श्री देव नवा कालभैरव देवस्थान तर्फे ११ ऑक्टोबर पासून नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे.यामध्ये देवस्थांतर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये ११ रोजी सकाळी ७ वाजता घटस्थापना,व श्रींची पंचामृती पूजा. सायंकाळी ४.३० वा. ‘शारदा स्रोत्र’ पठण-श्री लक्ष्मी नारायण महिला मंडळ,चिपळूण ५.३० वा. ‘दुर्गा स्तुती’ गौराई ग्रुप कावीळतळी,रात्री १० वा.शाम परांजपे मित्र मंडळ रावतळे यांचे संगीत भजन होणार आहे.१२ रोजी सायंकाळी ४.३० वा तालसाधना संगीत महिला भजन मंडळ,खेर्डी तर रात्री १० वा.चिपळूण शंकरवाडी येथील श्री गांधारेश्वर प्रासादिक संगीत भजन मंडळाचे,भजन होणार आहे.१३ रोजी सायं. ४.३० वा.विश्वकर्मा महिला संगीत भजन मंडळ चिपळूण यांचे भजन,रात्री १० वा.श्री साई शंकर संगीत भजन मंडळ,मुरादपूर (भोईवाडी) यांचे भजन होईल.१४ रोजी.सायं.४.३० वा.श्री शक्तीचा जागर-कात्यायनी मंडळ ,निरूपण सौ शिला केतकर करणार आहेत.रात्री १० वा.श्री कालभैरव संगीत भजन मंडळ शंकरवाडी यांचे भजन होणार आहे.१५ रोजी ललिता पंचमी दिनी सकाळी ६ वा.नवचंडी पाठ व देवी पूजा,कुंकू मार्जन,व पंचामृती पूजा,महाआरती,कुमारिका पूजन,सायं.४.३० वा.चिपळूण च्या गणेश महिला मंडळ मतेवाडीचे पारंपरिक गाणी व टिपऱ्या नृत्य होईल.रात्री १० वा.हनुमान प्रसादिक संगीत भजन मंडळ ओझरवाडी यांचे भजन होईल.
१६ रोजी सायं.४.३० वा.’देवीची उत्सवी रुपे’ स्नेहवर्धिनी महिलामंडळ चिपळूण हे देवीची गाणी, नृत्य,स्तोत्र,व अभिनय सादर करणार आहेत.ह्या कार्यक्रमाची संकल्पना व लेखन सौ विशाखा चितळे यांनी केले आहे.१७ रोजी सायं.४.३० वा.श्रीराम संगीत महिला भजन मंडळ (वैश्यवसाहत)यांचे भजन,रात्री १० वा.नवयुग संगीत भजन मंडळ कांगणेवाडी यांचे भजन होणार आहे.१८ रोजी सकाळी ८ वा घटी देव उठवणे,सायं.४.३० वा.उक्ताड चिपळूण येथील उक्ताड महिला मंडळाचे पारंपरिक नृत्य होईल.रात्री १०वा.उक्ताड च्या गणेश प्रासादिक संगीत भजन मंडळाचे भजन होईल.
१९ रोजी सायं.४.३० सहेली ग्रुप चिपळूण तर्फे भोंडला होईल.रात्री ९.३० वा.शंकरवाडी च्या तुलारामबुवा जोगले प्रासादिक भजन मंडळाचे भजन होईल.त्यानंतर हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ खेंड चिपळूण यांचे भजन होईल.२० रोजी सायं.३.३० वा विजयादशमी,सिमोल्लंघन ,श्रींची संवाद्य पालखी मिरवणूक व सोने.लुटणे कार्यक्रम होईल.सायं.६.३० वा.स्वरदर्शन कलाकुंज प्रस्तुत स्वरसुमनांजली ह कार्यक्रम होणार आहे.सौ उत्तरा भागवत साडविलकर यांचा हा भावगीत,भक्तिगीत,नाट्यगीतांचा कार्यक्रम असेल.
नवरात्रोत्सवानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमाना उपस्थित राहावे असे आवाहन विश्वस्त मंडळ व नवरात्र उत्सव कमिटी यांनी केले आहे.













