संदीप चौकेकर मित्रमंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
कणकवली : शिरवल-खासकीलवाडी येथे ११ ते १९ आॅक्टोबर या कालावधीत संदीप चौकेकर मित्रमंडळातर्फे शारदिय नवरात्रोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
रविवार ११ रोजी सकाळी १० वा. घटस्थापना, दुपारी १२ वा. आरती, तीर्थप्रसाद, रात्री ८ वा. अमित मेस्त्री यांचे भजन होईल. ११ ते १९ या कालावधीत दररोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील. शनिवार १७ रोजी दुपारी १ वा. भंडारा (महाप्रसाद), सायं. ४ वा. हळदीकुंकू, रात्री ८ वा. महाप्रसाद, १० वा. आई मोराई प्रा. भजन मंडळ, बोर्डवेचे बुवा मकरंद मोडक व लिंग पावणादेवी प्रा. भजन मंडळ, दारिस्तेचे बुवा स्वप्नील गोसावी यांच्या डबलबारी भजनाचा सामना होईल. रविवार १८ सायं. ७ वा. होम मिनिस्टर स्पर्धा होईल. सोमवार १९ रोजी रात्री १० वा. खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचे ‘कुलवंतांची सून’ हा प्रयोग होईल. तरी सर्वांनी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन संदीप चौकेकर मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.












