माखजन इंग्लिश स्कूल येथे संस्थापक दिन साजरा

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे संस्थापक दिन साजरा करण्यात आला.
संस्थेचे प्राणवायू कै.गो.बा.नातू यांच्या स्मृतिदिनी हा संस्थापक दिन साजरा करण्यात येतो.यावेळी माखजन इंग्लिश स्कूल माखजन,ॲड.पी.आर.नामजोशी कला,वाणिज्य,विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक तसेच सभासद,आजी माजी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,शिक्षण प्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष शशिकांत घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक नितीन वीरकर उपस्थित होते.यावेळी कै.गो.बा नातू व आद्य संस्थापकांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण करत,आदरांजली वाहण्यात आली.प्रास्ताविकातून संस्था सचिव श्रीकांत फाटक यांनी संस्थापक दिन साजरा करण्यामागची भूमिका विषद केली.
यावेळी संस्थापक दिनानिमित्त ज्या ट्रस्ट च्या स्पर्धा घेतल्या जातात त्यांचे बक्षीस वितरण झाले.विशेष बाब म्हणजे मराठी,इंग्रजी,हिंदी अशा तीन भाषेत एकाच विषयावर भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांला मानाची ढाल बक्षीस दिली जाते.यावर्षी सलग चौथ्यांदा कु.कल्याणी सचिन साठे हिने ढाल पटकावली.व कार्यक्रमावेळी इंग्रजी भाषेतून आपले बहारदार भाषण सादर केले.बक्षीस वितरण सोहळ्याच निवेदन महादेव शिंदे यांनी केले.
दरम्यान या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या नितीन वीरकर यांनी प्रशालेला सुमारे ३ लाख रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य भेट दिले.यावेळी त्यांना शाल श्रीफळ पुष्पगुछ व निसर्ग चित्राची प्रतिमा भेट देत सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी प्रशालेतील शिक्षक महादेव शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल,मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सय् य्न्मानित करण्यात आले.यावेळी श्री दिलीप जोशी,संदेश पोंक्षे व मुख्याध्यापक महादेव परब यांनी मनोगते व्यक्त केली.माजी शिक्षक गोविंद आंबेटकर यांनी संस्थापक दिनावर लिहिलेला पोवाडा सादर केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकांत घाणेकर यांनी आद्य संस्थापकांना आदरांजली अर्पण करत आपले विचार मांडले.या कार्यक्रमावेळी उपाध्यक्ष राजेश फणसे,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत भोसले,सुभाष सहस्त्रबुद्धे,विद्याधर भागवत,पर्यवेक्षक अंबादास घाडगे आदी उपस्थित होते.
.आभारप्रदर्शन दिपक शिगवण यांनी केले तर सूत्रसंचालन गौरव पोंक्षे यांनी केले.