रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी):
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आयोजित तालुक्यातील शाळांसाठीच्या ‘आंतरशालेय कचऱ्यातून कलाकृती स्पर्धा २०२६’ (कर्तव्य जागर फेस्ट) मध्ये पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेत पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ व पुनर्चक्रण योग्य वस्तूंचा (जसे की गोणपाटाचे कापड, रंगीबेरंगी कापडी तुकडे व इतर टाकाऊ साहित्य) अत्यंत कल्पकतेने वापर करून एका देखण्या कलाकृतीची (फुलपाखराच्या आकाराचे आकर्षक वॉल हँगिंग) निर्मिती केली. या कलाकृतीमागील संकल्पना व मार्गदर्शन श्रीमती मीरा दामले मॅडम यांचे होते. त्यांच्या या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंचा प्रभावी वापर आणि उत्तम सादरीकरण करत परीक्षकांची मन जिंकली.
या विजेत्या संघात ओम मीनल पवार (Om Minal Pawar), स्वर्णिमा संतोष भगवे (Swarnima Santosh Bhagave) आणि हर्षद आनंद बिर्जे (Harshad Anand Birje) या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
विजेत्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका टि.सौ. जानकी विवेक घाटविलकर, शिक्षकवृंद, संस्था चालक व पालकांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक श्रीमती मीरा दामले मॅडम यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













