बांदा ग्रामपंचायत व नाबर प्रशाला यांच्यातर्फे निशान येथे वनराई बंधारा
बांदा : प्रतिनिधी
संभाव्य पाणीटंचाई समस्येवर मात करण्यासाठी बांदा ग्रामपंचायतने वनराई बंधारे उभारण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांदा – निशान येथे ग्रामपंचायत प्रशासन व व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने वनराई बंधारा बांधण्यात आला.
यावेळी माजी उपसरपंच बाळू सावंत यांनी संभाव्य पाणीटंचाई संकटाची माहिती दिली. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाण्याची पातळी बरीच खाली गेली आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहणार आहे. यासाठी शासनाच्या निर्देशानुसार पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून गावात ठिकठिकाणी वनराई बंधारे उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, माजी उप सरपंच बाळू सावंत, ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब, आबा धारगळकर, श्याम मांजरेकर, माजी सरपंच अशोक सावंत, दुग्ध सोसायटी चेअरमन गजानन गायतोंडे, नाबर प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, प्रशांत देसाई, रसिका वाटवे, वेलांकी पेडणेकर, प्रकाश झाटये, वेदिका मळीक, अकबर खान, श्रीनिवास मोर्ये, प्रवीण सावंत, अरुण मोर्ये, संजय सावंत, परशुराम सावंत, हरी मांजरेकर, सोहम सावंत आदीसह व्ही. एन. नाबर प्रशालेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळू सावंत यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.













