भाजपच्या उद्योग विभाग संयोजकपदी संगमेश्वरचे उद्योजक दत्ताराम लिंगायत यांची नियुक्ती

पक्षनिष्ठेचे बक्षीस; जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी दाखवला मोठा विश्वास

देवरूख (प्रतिनिधी):

भारतीय जनता पार्टीच्या गाव तिथे उद्योजक या उपक्रमांतर्गत चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या उद्योग विभाग संयोजक या पदावर संगमेश्वरचे उद्योजक तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचे खंदे समर्थक दत्ताराम उर्फ दत्ताशेठ लिंगायत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.रविवारी त्यांना अधिकृत पत्र देऊन जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.

भारतीय जनता पार्टीचे सेवा संकल्प अभियान देशभरात सुरू आहे. त्याअनुषंगाने वेगवेगळे लोकाभिमुख उपक्रम राबवले जात असून त्यामध्ये “गाव तिथे उद्योजक”हा एक महत्वकांक्षी उपक्रम राबवला जात आहे.मोठ्या उद्योजकांशी सलग्न असलेले छोटे-छोटे उद्योग ग्रामीण भागात आणण्यासाठी प्रयत्न करणे,तसेच ग्रामीण भागात नवीन उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करून रोजगार निर्मितीला चालना देण्याचे काम या पदाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.त्यामुळे ग्रामीण भागाच्या माध्यमातून या पदाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.

पक्ष संघटना आणि उद्योग असे महत्वाचे काम या पदाच्या माध्यमातून होणार असल्याने या पदावर जबाबदार व सुशिक्षित व्यक्तीची नियुक्ती होणे आवश्यक होते.जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आमदार प्रमोद जठार यांच्या मार्गदर्शनाखाली या पदासाठी दत्ताराम उर्फ दत्ताशेठ लिंगायत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.रविवारी सकाळी खेर्डी येथील स्वामींनी निवास्थानी दत्ताशेठ लिंगायत यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

यावेळी भाजपचे जेष्ठ नेते माजी जिल्हापरिषद सदस्य मुकुंद काका जोशी, जिल्हा चिटणीस अनिल सावर्डेकर, योगेश शिर्के, स्वानंद रानडे, संगमेश्वर ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष धोंडू करंबेळे गुरुजी, प्रीतम बांडागळे, गोरक्षक प्रकोष्ट अध्यक्ष अविनाश गुरव, संगमेश्वर पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मनोज शिंदे, तुरळचे माजी सरपंच शंकर लिंगायत, धामणीचे जेष्ठ कार्यकर्ते नंदू गुरव, बाळकृष्ण वनकर गुरुजी, देवरुखचे व्यापारी भोपळकर शेठ, तेजस भोपळकर, प्रवीण गुरव, बावा मोहिते, बल्लाळ, रेडीज यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.