देवरूख (प्रतिनिधी):
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील अतिवृष्टीमुळे जड वाहनांसाठी गेले अनेक महिने बंद असलेली वाहतूक आंबा घाटातून घटस्थापनेच्या मुहूर्तावर त्वरित चालू करा अन्यथा आंबाघाट रस्ता मला येऊन खुला करावा लागेल असे आमदार किरण सामंत यांनी साखरपा येथील नागरिकांच्या समस्या निवारण सभेत सांगताच आज अनेक महिन्यांची प्रतीक्षा संपली आणि आंबा घाट रस्ता जडवाहनांसाठी घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुला करण्यात आला.
अतिवृष्टीच्या दणक्याने आंबा घाटातील रस्ता खचला एक साईड कोसळली त्यामुळे जड वाहनांची वाहतूक त्वरित बंद करण्यात आली त्यामुळे व्यापारी वर्गाची फार मोठी अडचण झाली. मात्र आता पाऊस कमी असून उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे घाट कोसळण्याची भीती ही कमी झाली आहे अशा परिस्थितीत व्यापारी वर्गाची मागणी पाहता जड वाहनांसाठी वाहतुकीसाठी आंबा घाटातील रस्ता घटस्थापनेच्या मुहूर्तावर चालू करावा अशा सूचना बांधकाम विभाग यांना भैय्या सामंत यांनी या सभेतच दिल्या आणि आमदार भैय्या सामंत यांचा “शब्द म्हणजे वचन ” याचा प्रत्यय जिल्ह्यातील जनतेला आला. आ. भैय्या सामंत यांनी दिलेला ‘शब्द म्हणजे वचन ‘ याचा प्रत्यय पुन्हा जिल्ह्यातील जनतेला आला त्यामुळे जिल्ह्यातील जनतेने आमदार भैय्या सामंत यांचे आभार मानले आहेत.













