जीवाची बाजी लावून बडणाऱ्या पर्यटकाचे वाचवले होते प्राण
आचरा l प्रतिनिधी
आचरा समुद्र किनारी मंगळवारी सकाळी समुद्र स्नानाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या मुंबई भायखळा येथील एक पर्यटक उतरले होते पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडत होते. जीवाची बाजी लावत त्यांचा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे होमगार्ड नितेश गुरव आणि अनिकेत परब यांचा आचरे गावात ठीक ठिकाणी सन्मान होऊ लागला आहे. इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान व आचरा ग्रामपंचायत तर्फे त्यांचे कौतुक करत सन्मान करण्यात आला आहे.
इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान येथे देवस्थान सचिव संतोष मिराशी यांच्या उपस्थितीत वहिवाटदार महादेव मिराशी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी सचिव संतोष मिराशी, महादेव मिराशी, सरपंच जेरॉन फर्नांडिस,उद्योजक ग्रामपंचायत सदस्य मुज्जफर मुजावर, पत्रकार परेश सावंत, अर्जुन बापर्डेकर, बाबू परुळेकर, अभय भोसले, मंगेश मेस्त्री, दशरथ घाडी, बाळा घाडी, उदय घाडी, आबा सावंत, अजित घाडी, विजय कदम, उपस्थितीत होते.
आचरा ग्रामपंचायत कडूनही सन्मान
आचरा समुद्र किनारी जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे होमगार्ड नितेश गुरव आणि अनिकेत परब यांच्या कार्याची दाखल घेत आचरा ग्रामपंचायततर्फे सरपंच जेरॉन फर्नांडिस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले ग्रामपंचायत लिपिक नरेश परब, रुपेश परब,वराडकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत आचरामध्ये शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला













