वेंगुर्ले : प्रतिनिधी
वजराट ग्रामपंचायत उपसरपंच पदी ग्रामसमृद्धी पॅनल वॉर्ड क्र 1 चे सदस्य श्री चेतन सावळाराम नाईक यांची बिनविरोध निवड करणेत आली ते या पाच वर्षा करीत नियुक्त असलेल्या कालावधीतील ४ थे उपसरपंच बनले आहेत.
त्यांच्या निवडी नंतर सरपंच सौ अनन्या आनंद पुराणिक यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मावळात्या उपसरपंच सौ. दिपीका दिनकर राणे यांनी संघटनेच्या प्रथे प्रमाणे कालवधी संपताच राजीनाम दिला त्यामुळे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. या प्रसंगी गिरेश्वर – सातेरी सहकारी सोसायटी चे चेअरमन श्री मनोहर परब, तंटामुक्ती अध्यक्ष श्री बाबुराव परब, माजी सरपंच अ. बा. परब, माजी उपसरपंच शाम पेडणेकर, सौ. प्रियांका केरकर, सदस्य सौ नम्रता देसाई, सौ.रसिका मैस्त्री, ग्रामस्थ श्री आनंद पुराणिक, श्री संदिप पेडणेकर, श्री प्रेमानंद सावंत भोसले, श्री साईप्रसाद केरकर, श्री नितीन सावंत, श्री मकरंद गोंधळेकर ग्रामपंचायत कर्मचारी श्री प्रविण गावडे श्री शुभम मुंजी सौ पूर्वा कांदे आदी उपस्थित होते.













