गावातील ज्येष्ठ नागरीक, महिला बचत गट, शाळा व्यवस्थापन समिती यांचा उत्स्फूर्त सहभाग
संतोष कोत्रे
लांजा: पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिरंबवली गावामध्ये गावातील ज्येष्ठ नागरीक, महिला बचत गट, शाळा व्यवस्थापन समिती, शाळेची विद्यार्थी शिक्षक अंगणवाडी कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभाग आणि श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला.
यावर्षी पाणीटंचाईची झळ हे गावागावांना बसणार आहे. त्यामुळे शासनाकडून वनराई विजय व अन्य प्रकारचे बंधारे बांधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यानुसार तालुक्यातील शिरंबवली गावामध्ये ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे एकत्र येत श्रमदान करून वहाळावर बंधारा बांधला. या उपक्रमात गावातील जेष्ठ नागरिक महिला सुनिता सावंत, सुगंधा सावंत,राजश्री पवार, ज्येष्ठ नागरिक पुरुष चंद्रकांत सावंत, शशिकांत धावडे, महिला बचत गटाच्या
सुहासिनी सावंत,सुनिता धावडे,अनिता पवार ,मनीषा भरवडे,सुगंध धावडे ,सुचिता धावडे, ग्रामस्थ संकेत सावंत,प्रकाश धावडे ,प्रवीण धावडे ,पोलीस पाटील
दर्शना दिगंबर सावंत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका अश्विनी पाटील, शाळा मदतनीस
श्रद्धा पवार, अंगणवाडी सेविका अंजली चव्हाण,
मदतनीस श्रेया सावंत, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष करुणा सावंत, ग्रामपंचायत पाणी ऑपरेटर रघुवीर सावंत, विद्यार्थी प्रतिनिधी मंथन सावंत
उपस्थित होते.
दरम्यान, या बंधाऱ्यामुळे गावातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.













