सावंतवाडी भटवाडीत ओंकार नवरात्रोत्सव मित्रमंडळातर्फे भव्य रंगभरण स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी : भटवाडी येथील ओंकार नवरात्रोत्सव मित्रमंडळातर्फे रविवार, १८ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांसाठी भव्य रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दुपारी ४ ते ५ या वेळेत होणार असून, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

ही स्पर्धा इयत्ता १ ली ते ४ थी, ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १० वी अशा तीन गटांत आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार असून, प्रत्येक गटातून दोन उत्तेजनार्थ बक्षिसेही दिली जाणार आहेत.

स्पर्धकांनी स्वतःचे लेखनपॅड व तेलखडू आणणे आवश्यक आहे. मंडळातर्फे चित्र व खाऊ दिले जाणार आहे. स्पर्धेचे ठिकाण भटवाडी येथील ओंकार नवरात्रोत्सव मित्रमंडळाचा देवी मंडप आहे.विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपली कलागुण दाखवावेत, असे आवाहन मंडळाने केले आहे.

 

शिवम सावंत – ९९२३६७७५८६

रोहन गावडे – ७८४१९८६७१६

यश जीवने – ९८६०५२१४४७