वाडीवस्तीवर ग्रामस्थांचा “पाणी अडवा पाणी जिरवाचा नारा”
गुहागर | प्रतिनिधी
गुहागर पंचायत समितीच्या मिशन बंधारे मोहीमेला तालुक्यातून सध्या उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. गुहागर तालुक्यातील तळवली येथे गुरुवारी एकाच दिवशी तब्बल 10 बंधारे बांधण्यात आले.
गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन तालुक्यात मिशन बंधारे मोहीम राबविण्याचे आवाहन केले.या आवाहनाला आता सर्व स्तरांतून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.ग्रामपंचायतींच्या पुढाकारातून व ग्रामस्थांच्या उस्फुर्त श्रमदानातून पाणी अडवा पाणी जिरवाचा नारा बुलंद करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.गुहागर तालुक्यातील तळवली येथे गुरुवारी तब्बल 10 बंधारे बांधण्यात आले.यामध्ये भेळेवाडी येथे 2, मोठी बौद्धवाडी येथे 1, सावंतवाडी येथे 1, डावलवाडी येथे 4, भडकंबावाडी येथे 2 असे वाडीस्तरावर एकूण 10 बंधारे बांधण्यात आले. यावेळी उपस्थिती तळवली ग्रामपंचायत प्रशासक श्री एस. आर. बागुल, ग्रामपंचायत अधिकारी एस. बी गोरे, मंडळअधिकारी श्री जाधवर, तलाठी श्री भिसे व भेळेवाडी,मोठी बौद्धवाडी,सावंतवाडी,डावलवाडी,भडकंबावाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.













