आनंदराव पवार महाविद्यालयाचा आयुष बार्जे याची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत चमकदार कामगिरी

चिपळूण (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा परिषद आणि जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा मैदानी स्पर्धेमध्ये १९ वर्षा खालील मुले या गटातून आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या आनंदराव पवार महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. आयुष अशोक बार्जे याने ८०० मीटर धावणे व्दितीय क्रमांक, १५०० मीटर धावणे व्दितीय क्रमांक आणि क्रॉस कंट्री (१० कि.मी. धावणे) व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
तसेच त्याची पुढे २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या कोल्हापूर विभागीय शालेय क्रीडा मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, क्रीडा प्रशिक्षक-मार्गदर्शक, सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.