राजापूर प्रतिनिधी :रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आणि कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांची शुक्रवारी आपल्या राजापूर दौऱ्यात राजापुरातील जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाला भेट दिली. याप्रसंगी मंडळाच्या वतीने आ. राणे यांचा सन्मान करण्यात आला.
आ. निलेश राणे हे दरवर्षी नवरात्र उत्सव काळात राजापुर तालुका दौऱ्यावर येतात, यावेळी ते काही मंडळांना भेटी देतात व तालुक्यातील प्रसिध्द आडिवरे येथील श्री देवी महाकालीचे दर्शन घेतात. शुक्रवारी आपल्या या राजापूर दौऱ्यात आ. राणे यांनी राजापुर शहरातील एसटी डेपो येथील जयमहाराष्ट्र मित्र मंडळाच्या नवारात्र उत्सवाला भेट दिली.
याप्रसंगी मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष अनिल गुरव व पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले. तर मंडळाचे पदाधिकारी दीपक गुरव यांच्या हस्ते शाळ, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन आ. राणे यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे नेते रवींद्र नागरेकर, दीपक बेंद्रे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिक मटकर, अरवींद लांजेकर, अमर वारीशे, आशिष मालवणकर, सागर खडपे यांसह मंडळाचे अध्यक्ष अनिल गुरव, उपाध्यक्ष ऋ षी अमरे, सचिव जगदिश गुरव खजिनदार प्रभाकर गुरव व मंडळाचे कार्यकर्ते विनायक गुरव आदींसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आ. राणे यानी जयमहाराष्ट्र मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाला शुभेच्छा दिल्या व मंडळ राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे कोतुक केले.














