लांजा (प्रतिनिधी): जिल्हातरीय १४ वर्षे वयोगट शालेय खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावलेल्या
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे विभागीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने जिल्हातरीय १४ वर्षे वयोगट शालेय खो-खो स्पर्धा डेरवण येथे नुकत्या संपन्न झाल्या. या स्पर्धेत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे या प्रशालेच्या मुलांनी गतवर्षीच्या विजयाची परंपरा कायम राखत जिल्हा स्पर्धेत अंतिम विजेतेपद पटकावले. मुलांच्या संघात कर्णधार आदित्य माटल,आयुष इंगळे ,चिराग पाटोळे,देवांत दरडे, आदित्य नामये, उमेश इंगळे, आर्यन इंगळे यांनी सर्व सामन्यात उत्कृष्ट संरक्षण केले.त्यांना पार्थ आगरे,राज कांबळे,यश जाधव, आर्यन माने, प्रज्वल सुतार,संभव दरडे, साईराज मोहिते,रितिक घाणेकर यांनी साथ उत्कृष्ट साथ दिली.सर्व सामने १ डाव राखून जिंकले.
तसेच १७ वर्षे मुलगे संघ जिल्हा उपविजेता ठरला. कर्णधार – सौरभ कामेरकर, प्रसाद पाष्टे,प्रयाग नामये,चेतन इंगळे, श्लोक मांडवकर,श्रेयस तिखे,तनीश तिखे यांनी उत्कृष्ट संरक्षण केले . त्यांना शुभम इंगळे,समर्थ साळवी, सार्थक गुरव,सोहम गुरव,सोहम इंगळे, रोहीत इंगळे, आर्यन भितळे,अंश पालकर यांनी साथ दिली.अंतिम फेरीत स्थान पटकावून अंतिम सामन्यात संघ उपविजेता ठरला.
प्रशालेच्या या सर्व खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख गणेश झोरे,विजय पाटोळे, सुशील वासुरकर,चेतन सनगले,दिपक धावडे यांचे मार्गदर्शन लाभले.विजयी खेळाडू व मार्गदर्शक यांचे तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबईचे अध्यक्ष आनंद पेडणेकर व पदाधिकारी मुंबई कमिटी, स्थानिक कमिटी पदाधिकारी,शाळा समिती पदाधिकारी पालक,मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून कोल्हापूर विभागीय स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत.













