वैभववाडीतील दुर्गामाता मंडळांसह आदिष्टी देवी मंदिराला भेट
वैभववाडी l प्रतिनिधी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी शुक्रवारी रात्री वैभववाडी शहरातील दुर्गामाता उत्सव मंडळांना भेट देत दुर्गामातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वैभववाडी सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळ तसेच रणझुंजार मित्र मंडळाच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या दुर्गामातेचे दर्शन घेतले. त्यानंतर वाभवे-वैभववाडी येथील आदिष्टी देवी मंदिरात भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.
नवरात्रोत्सवानिमित्त वैभववाडी शहरात विविध ठिकाणी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी मंडळांना भेट देत देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. त्यांच्या भेटीमुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
याप्रसंगी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत, शांताराम काका रावराणे, दुर्गामाता उत्सव मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष तेजस आंबेकर, रत्नाकर कदम, उद्योजक विजय तावडे, जिल्हा परिषद सदस्या श्रावणी रावराणे, भाजपा महिला अध्यक्ष प्राची तावडे, नेहा माईणकर, विवेक रावराणे, रोहन रावराणे, रणजीत तावडे, वैभव रावराणे आणि आशिष रावराणे उपस्थित होते.
तसेच रणझुंजार मित्र मंडळाचे संजय चव्हाण, आदित्य चव्हाण, संतोष पवार, शुभम चव्हाण, मंगेश चव्हाण, अक्षय मोहिते, मनीषा चव्हाण यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












