चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी शुक्रवारी चिपळूणमधील नवरात्र उत्सव मंडळाला सदिच्छा भेट देत देवीचे दर्शन घेतले. यावेळी मंडळातर्फे आ. राणे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी राजापूर येथील नवरात्रोत्सव मंडळाला सदिच्छा देवीचे दर्शन घेतले. नंतर सायंकाळी उशिरा चिपळूणमधील नवरात्रोत्सव मंडळाला सदिच्छा देवीचे दर्शन घेतले. चिपळूण शहरातील बाजारपेठ मित्र मंडळ, भैरी भवानी मित्र मंडळ, गोंधळी समाज मित्र मंडळ, काविळतळी येथील ओंकार मित्र मंडळ येथील देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी शिवसेना चिपळूण तालुकाप्रमुख दिलीप चव्हाण, चिपळूण नगर परिषदेचे पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के, आरोग्य समिती सभापती शुभम पिसे, नगरसेवक उदय जुवळे, विकी लवेकर, नगरसेविका सौ. हर्षाली पवार, माजी नगरसेवक परिमल भोसले, शिवसेना युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले, उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण, विभागप्रमुख सुधीर पानकर, विशाल नरळकर आदी उपस्थित होते.













